मराठी भाषेत संवादासाठी !!!!

February 17, 2011 § Leave a comment


नमस्कार मित्रांनो,

आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की एखाद्या वेबसाइटवर किंवा ई-मेल आपण मराठीत कसा करू शकतो. आता मराठीत लिहिणे अत्यंत सोपे झाले आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की लिहिण्याचे तंत्र बहुसंख लोकांना अवगत नसते. मी या ब्लॉगद्वारे मराठीत लिहिण्याचे तंत्र सांगणार आहे. सर्वात प्रथम थोडीशी पार्श्वभूमी समजावून घेवुया म्हणजे आपल्याला पूर्वीच्या आणि आताच्या मराठी लिहिण्याच्या तंत्रातला फरक लक्षात येईल. मी फार तांत्रिक बाबीत जाणार नाहीये.

पूर्वीचे संगणक single byte character set आधारित असल्याने प्रामुख्याने इंग्लिश, रोमन इत्यादी भाषा समावेश होता तर देवनागरी व इतर एशियन लिपिंसाठी प्रयोजन नव्हते. दरम्यानच्या काळात संगणक क्रांती घडून माहिती तंत्रज्ञाचा भारतात ही मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. परंतु संगणक प्रणाल्या single byte character set आधारित असल्याने देवनागरी लिपिंसाठी पर्याय शोधणे सुरु झाले. काहींनी देवनागरी व इतर भारतीय भाषेसाठी आज्ञावल्या व फॅन्टस् विकसित केल्या. ह्या आज्ञावल्या व फॅन्टस् single byte character set मधील वापरात नसलेल्या अक्षरांचा वापर करून तयार करण्यात आल्या होत्या. म्हणून अश्या आज्ञावल्यांमध्ये लेखन इतर ठिकाणी पाहण्यासाठी किंवा त्यात सुधार करण्यासाठी त्याच आज्ञावली व फॅन्टस् गरज भासायची अन्यथा सर्व मजकूर विचित्र दिसायचा. संगणकीय भाषेत या लिखाणाचा तसा कोणताच उपयोग नव्हता.

एकविसावे शतक येता येता संगणक विश्वात अनेक बदल घडून Multi Byte Character Set विकसित होऊन युनिकोडचा समावेश करण्यात आला व देवनागरीसह इतर भारतीय लिपींना संगणकीय भाषेत स्थान मिळाले. आता बहुसंख्य आज्ञावल्या युनिकोड आधारित असून तसे देवनागरीत लिहिण्यासाठी कोणत्याही स्वतंत्र आज्ञावलीची आवश्यकता नाही. सुरुवातीला युनिकोडमध्ये लिहिण्यासाठी मुलतः इंनस्क्रिप्ट ले-आऊट उपलब्ध असल्यामुळे अडचणी येत असत. सर्व ठिकाणी टाईप करण्यासाठी टाईपरायटर ले-आऊट किंवा फोनेटिक ले-आऊट प्रामुख्याने वापरण्यात येत होता. परंतु आता या अडचणीवर मात करण्यात आलेली असून तुम्ही तुमच्या आवडत्या ले-आऊट द्वारे देवनागरीत म्हणजेच मराठीत टाईप करू शकता.

केंद्र शासनाच्या http://ildc.in/Marathi/Mindex.aspxhttp://www.cdac.in या संकेतस्थळावर मराठी भाषेसाठी उपयोगी आज्ञावल्या उपलब्ध आहेत. भारतीय भाषेसाठी मायक्रोसॉफ्ट या अग्रगण्य कंपनीने ही उपयोगी आज्ञावल्या http://www.bhashaindia.com या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून दिल्या आहेत. तर यामध्ये गूगल ही मागे राहिलेले नाही, त्यांनीही http://www.google.com/ime/transliteration/http://www.google.com/transliterate या संकेतस्थळावर विनामूल्य भाषेंसाठी उपयोगी आज्ञावल्या देऊ केल्या आहेत.

युनिकोडमध्ये केलेले लेखन संगणकीय भाषा आधारित असल्यामुळे ते पाहण्यासाठी कोणत्याही विशेष आज्ञावलीची किंवा विशेष फॅन्टस् ची गरज लागत नाही. विंडोव-२००० व त्यापेक्षा प्रगत ऑपरेटिंग सिस्टीम युनिकोड आधारित असल्यामुळे संगणकात नव्याने फॅन्टस् आवश्यकता नाही. आता बहुसंख्य आज्ञावल्या युनिकोड आधारित असल्यामुळे तुम्ही ई-मेल, चॅट आणि बरेच काही करू शकता आपल्या मराठी भाषेत. मराठी भाषेत संवादासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे, चला तर आता आपण सर्व आजपासूनच मराठीचा वापर सुरु करूया.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

What’s this?

You are currently reading मराठी भाषेत संवादासाठी !!!! at Mahindraa's Blog.

meta

%d bloggers like this: